Saturday, 30 August 2014

serial

आपलं आयुष्य हे serial सारखं असतं.
सतत पुढे काय होईल याची चिंता, उत्कंठा आणि आतुरता
तरीही समरसून जगण्याची चिरंतन ओढ.
रोज नवा दिवस, नवा संघर्ष, नवा drama.
दिवसाच्या शेवटी freeze point.
आजचा दिवस बरा गेला नी उद्या काय वाढून ठेवलंय?
अशी घालमेल, खळबळ मनात ठेवून जाणारा

समाज हे या serial चं production house.
सोबत वा-यासारखी परिस्थितीची programming team.
यांच्या सोयीनुसार
आपण कधी Director असतो
कुठलेही सूत्र हाती नसलेले.
तर कधी Artist असतो,
कुठलेही Expression चेह-यावर दाखवता
मुखवटा घालून वावरणारे.
नाहीतर कधी काळजीवाहू Technicians.

असा हा समाज आणि परिस्थिती
नवनिर्मितीच्या वाटेवर अडथळा ठरू लागतात.
आपण यांच्याकरवी खेळवले जात राहतो
मग फाटलेल्या मनाला ठिगळ लावण्यासाठी 
Editing चे संस्कार हसत हसत केले जातात.
आपल्याला पुन्हा पुन्हा आकर्षित करण्यासाठी 
Serial चे Promo दाखवले जातात.
आणि भावनेचा निचरा (catharsis of emotions) होण्याऐवजी 
त्याचा Dailysoap telecast होत राहतो
कशासाठी तर TRP साठी
हे कुठेतरी थांबायला हवं

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर 
नवी आव्हाने पेलताना 
जीवनाचा गाभा, मूल्यं हरवून कसं चालेल?
म्हणूनच आपल्या आयुष्याच्या Serial ची
Story, Screenplay, dialogue
आपणच लिहायला हवेत.
तरच आपल्या आयुष्याच्या Serial मधील प्रत्येक Scene
Without break enjoy
करता येईल!!!





No comments:

Post a Comment