वृक्षाने छाया देणे
सोडले,
तर त्याची माया आटली,
असा समज झाला तुझा
लगेच आश्रमाची वाट
दाखवून
मोकळाही झालास
पण तुझ्याही नशिबी
असेच दिवस येणार आहेत
तयार रहा
जेव्हा कॉम्प्यूटरसमोर
बसलेलं
तुझं कार्टं
तुला माऊससारखं
खेळवून खेळवून
घराबाहेर काढेल तेव्हा
वृक्षाची छाया-माया
सारं काही आठवेल...
No comments:
Post a Comment