Sunday, 17 January 2016

ROSE (रोज) DAY

आज सूर्य उगवला
अगदी रोजच्यासारखा
कोंबड्याच्या आरवण्याने किंवा आलार्म मुळे जाग येते
तशी आजही जाग आली
पक्ष्यांच्या सुस्वर कुजनाने
उषेचे स्वागत झाले
सूर्यकिरणांची रांगोळी अंगणात आली

एक चैतन्यमयी पहाट
सूर्याचे येणे आणि चंद्राचे जाणे
एक दिवस संपतो
दुसरा सुरू होतो
आजचा हा नवा दिवस
कसा असेल? चांगला की वाईट? माहीत नाही.
ते घडवणं मात्र आपल्याच हातात आहे.
पण हा नवचैतन्य घेऊन येणारा
“DAY” कुठला हे आधीच ठरलेलं होतं
फ्रेंडशीप डे
व्हॅलेंटाईन डे
सारी डे
कि ट्रॅडिशनल डे...

तुझ्या शोधात

आठवणींच्या डोहात बुडताना
स्वप्नांची नदीही वाहत राहते...
एक एक धागा सैल सैल होत जातो,
आठवणींचा पट स्वप्नपटाला जोडला जातो
त्यावर रंगीबेरंगी चित्रे उमटू लागतात,
तुझ्यासोबत रंगवलेली
एक टुमदार घरकुल, त्यासमोरील अंगण
हिरवा शालू नेसून, सौभाग्य भूषणे लेवून
तुळशीपुढे दिवा लावणारी मी...
साऱ्या घराचं हित पाहणारी
तुझ्या सोबतीमुळे एकाकीपणाचा कलंक मिटला
आयुष्याला नवा अर्थ मिळाला, असं म्हणणारी मी
ही आणि अशी कितीक स्वप्ने साकार व्हावीत
ती उराशी घेऊन
तुझ्या शोधात
तुझीच...

Friday, 15 January 2016

मी मराठी

मराठी माणसा शहरात राहतोस,
मराठी बोलायला लाजू नको
मायमाऊली ही आपली प्रेमळ भाषा, 
परदेशात गेलास तरी विसरू नको
मराठी माती, प्रेमाची नाती, 
मराठी संस्कृती, मराठी बाणा विसरू नको
खूप शिक मोठा हो, परकीय भाषा बोल, 
त्यासाठी मराठीचा बळी जाऊ देऊ नको





मराठी कला, पोवाडा, किर्तन, दशावतार, पंढरीची वारी विसरू नको
महाराष्ट्राची परंपरा, संत-सज्जनांची आठव, शूर शिवबाला विसरू नको
गणपतीची आरती, भवानी आईचा गोंधळ, श्रावणमासाचा महिमा विसरू नको


मुलखाचा तू मर्द मराठा, 
तुझा पराक्रम, तुझी किर्ती 
दशदिशांना घुमू दे
आणि मी मराठी हे दोनच शब्द तुझ्या तोंडी 
अभिमानाने येऊ दे, अभिमानाने येऊ दे



Tuesday, 5 January 2016

पढ़ने की आदत

क्या है, किस्मत में लिखा?
ये समझ में आता नही।
किस राहपर चली जा रही हूँ मैं?
किताबों से दिल लगा के,
मन को तसल्ली मिली।

किताबें बहोतसी पढ़ली मैने।
काश इन्सान का चेहरा पढ़ पाती।
क्या मेरी पढ़ने की आदत मुझ को दगा दे गई?
नही, पढ़ने की ये आदत अच्छी है मगर,
इन्सान के चेहरे पर ही नकाब हो तो क्या करे?