कधी उत्स्फूर्तपणे
लिहिलेल्या,
कलाविष्कार, हर्षोल्हास
अशा काव्य स्पर्धांच्या निमित्ताने लिहिलेल्या,
काही गावाकडच्या आठवणी
जागवत लिहिलेल्या,
काही स्वप्नांना मूर्त
रूप मिळावे म्हणून लिहिलेल्या,
- असे या ब्लॉगमधील निवडक कवितांचे स्वरूप आहे.
अनेक काव्यस्पर्धांमध्ये,
कवितांच्या कार्यक्रमामध्ये, आकाशवाणीवर माझ्याच आवाजात सादर केलेल्या आणि सोशल मीडियातून
प्रसिद्ध झालेल्या माझ्या निवडक कवितांना भक्तीगीत
या ब्लॉगमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या संग्रहात मराठी, हिंदी, मालवणी आणि
मराठी मिश्रित इंग्रजी या भाषांनी शब्दांतील भाव अधिक सहज आणि नादमधुर केले आहेत. कवितांबरोबरच हायकू (तीन ओळींचा जपानी काव्यप्रकार), चारोळ्या, कणिका (पाच ओळींचा जपानी काव्यप्रकार) अशा स्वरूपातील कवितांची एक वेगळी शैली म्हणजे गुलाबाच्या पुष्पगुच्छात सोनचाफ्याचे फूल उठून दिसावे. या संग्रहाचे हे वेगळेपण वाचकांचे नक्कीच लक्ष वेधून घेईल. वाचकांनी त्याचा आस्वाद घ्यावा.

मला अतिशय आनंद होत आहे की नव्या पिढीला भावणाऱ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून
मी माझ्या निवडक कविता प्रकाशित करत आहे...

No comments:
Post a Comment