तन-मन आज तृप्त जाहले, पावसात मी चिंब
भिजले
नभातून बरसल्या रेशीमधारा, सवे घेऊन आल्या
शितलवारा
सृष्टी झाली सचैल ओली, हरितसाज लेवून
नटली
काळ्याकुट्ट मेघांनी धरणीला
दिले दान, बळीराजाला लाभे सुख-समाधान
बेधुंद हा पाऊस-वारा, पहा! फुलला मयुरपिसारा
मौत्तिकाचे हे थेंब टपोरे, किती नि कसे वेचावे
बरे!
पर्जंन्यशोभा ही चार मासांची, रिमझिम सरींत मनसोक्त
भिजण्याची
मेघराजाचा अनुभवावा न्यारा
हा थाट, चातकापरी पहावी अशा पावसाची वाट

No comments:
Post a Comment