फक्त सुट्टीत माझी तिच्याशी भेट होते.
किती काळ आपण दूर राहिलो,
कसे सरले दिवस तुझ्याशिवाय…
मनाला कशी घातली समजूतॽ
या विचारांची दोघांशीही गट्टी होते.
डोळे पाणावू लागतात.
तिचा प्रेमळ स्पर्श होताच,
सर्व विसरून तिच्या मिठीत सामावून जाते.
वात्सल्याने पुरेपूर सुखावते.
सुट्टीचे दिवस पण कसे पटकन सरतात.
पुन्हा भाळी लिहिलेला विरहाचा क्षण समीप
येतो,
आणि भेट होण्याआधी जी अवस्था असते,
तिच पुन्हा होते…
आईऽऽऽऽऽऽ पुन्हा कधी भेटशीलॽ

No comments:
Post a Comment