Sunday, 13 January 2019

दिलासा


अश्रू रोखतात व्यक्त होणं...
शब्द फुटतच नाहीत,
खूपदा घडतं हल्ली असं, 
व्यक्त होताना...
अश्रू पापणीच्या पहाऱ्यातून निसटले की
त्याचे अर्थ बदलत राहतात
कुणासमोर रडलो त्याप्रमाणे
अलीकडे हे वारंवार घडतं...
बोलताना आसवं दाटणं,
हेही व्यक्त होण्यातलं संवादी रुप
माझ्याबाबतीत दुबळं ठरतंय
...शोधतेय तो दिलासा
तो धीर,
तो हात,
जो पापण्यात दाटलेल्या मेघांचे
स्वतःच्या समजुतीप्रमाणे अर्थ लावणार नाही
न बोलताच, त्याच्या घट्ट मिठीने
तो हात मला सावरत डोक्यावरून फिरेल...