माझे कोकण, माझे कोकण
सृष्टीचे हे नंदनवन
नारळ पोफळीच्या बागा
आंब्या फणसाची झाडे
काजू करवंदाची रेलचेल
उंचच उंच डोंगर – दऱ्या
सागरतीरीचा खारा वारा
तांबड्या मातीत पाण्याचे
झरे
गावागावात कौलारू घरे
दिवस कसा पटकन सरे
खळ्यातले चांदणे, देखणे
आकाश
कातरवेळेला काजव्यांचा
प्रकाश
पावसाच्या धारा, फेसाळत्या
लाटा
शुभ्र वाळूचा मोहक
किनारा
वर्षाच्या बारा महिने
सण-उत्सवांची धमाल
दशावताराची न्यारी
कमाल
पावसाच्या आगमनाने
धरती सजे
हिरवीगार शेते फुलती
वा-यासंगे हालती –
डुलती
वनराई घेई हिरवी शाल
शिमग्याला शेवया, होळीला
पुरणपोळी
शहाळ्याचं पाणी, उकड्या
भाताची पेज
कोकम सरबत, मालवणी
खाजा
यांची चव एकदम बेस
माश्यांच्या कालवणाचा
आस्वाद रसना तृप्त करतो...
साधी-भोळी कोकणची माणसा
पिकल्या फणसासारखी
काळजात आपुलकी थोडीशी
भीती
चाकरमान्यांचे लाड
पुरविती
कोकण रेल्वेने येवा
म्हणती
कोकणचा मेवा मनात
जपून ठेवा म्हणती… 
kavitaa suddhaa पिकल्या फणसासारखी vaatali.
ReplyDelete