Saturday, 30 August 2014

श्रावण

श्रावण
प्रसन्न, धार्मिक
आणि प्रितीचा बहर

श्रावणातला पाऊस
रानफुलांचा सखा
रंगसुगंधाची उधळण

श्रावणी सण
माहेरवाशिणीचे खूप कौतुक
तिचे फेर धरणे, गाणे…

श्रावणातले मांगल्य
मंगळागौरीचा थाट,
नववधूचा हिरवा शालू…

श्रावणातील हळवे क्षण
तिचे लाजणे, तिचे सजणे
त्याला हवेहवेसे वाटणारे

हा श्रावणतिचा अगदी लाडका
त्यालाही कळतेय… ही श्रावणातली गंमत
श्रावण म्हणजेतिचे खुलणे
आणि गोड हसणे

त्याला वाटते
आपणही व्हावे
श्रावण
तिच्यासाठी
फक्त
तिच्यासाठीच

No comments:

Post a Comment