Saturday, 30 August 2014

भीती

संवेदनशील मनाच्या पडद्यावर
चित्रे उमटतात
त्यातली बरीचशी
भीतीची असतात
सत्य, असत्य
बरे, वाईट
यांचा विचार करता
आत्मविश्वास, आपले ध्येय
या गोष्टी म्हणजे
खूप दूरचे प्रवासी
वाटू लागतात

तरीही बळ एकवटून
झुगारून दिलेच पाहिजे
हे भीतीचे साम्राज्य
तरच सापडेल मला हवी असलेली

अस्तित्त्वाची वाट…

No comments:

Post a Comment