Friday, 29 August 2014

अर्पणपत्रिका

गावची वेस ओलांडली आणि शहराची वाट चालू लागले तेव्हा गाव सोडल्याच्या दुःखाशिवाय मनात काहीच नव्हते. अतिशय वेदनादायी होता तो दिवस माझ्यासाठी. प्रचंड उलथापालथ झाली होती मनाची. त्याचवेळी मनाच्या एका कोपऱ्यात नवनिर्मितीची बिजं फुलू लागली होती. त्याची मला कल्पनाही नव्हती. गावातल्या निसर्गसमृद्ध जगण्याने मला सारे काही न मागता दिले.

सहावीत असताना एका प्रसंगात काय बोलावे हे सुचत नसताना घाबरलेल्या क्षणी शब्दांनी मला धीर दिला. खरं तर तोच माझ्या लेखनाचा पहिला निर्मितीक्षण होता. पण त्यावेळी काहीच कल्पना नव्हती की मी छान लेखन करू शकेन. 
आज मला लेखनामुळे ओळख मिळाली आहे. याचे सारे श्रेय माझ्या अवर्णणीय अशा माझ्या ओवळिये गावाला! 
माझ्या लेखनातील अनुभवांना गावच्या वातावरणातील संदर्भ होते. या पुढेही ते संदर्भ माझ्या लेखनातून येत राहतील. कारण गावाची आठवण नेहमीच माझ्या मनात भुईचाफ्यासारखी दरवळत असते. 

ब्लॉगच्या माध्यमातून प्रकाशित होणारा, 
माझा भक्तीगीत हा निवडक कवितांचा संग्रह 
माझ्या प्रिय ओवळिये गावाला अर्पण!


No comments:

Post a Comment