पुस्तकांनो,
तुमच्याविषयी काय बोलू?
माझी मलाच नव्याने ओळख,
तुम्ही करून दिलीत…
सगळं संपलं... असं वाटलं तेव्हा
माझा हात घट्ट धरून ठेवलात
एक काळ असा होता,
सोबतीला कोणी नव्हतं
साथ दिलीत तुम्ही
अगदी माझ्याही नकळत
लंपन, सावित्री, रमा-माधव, शर्मिष्ठा,
शितू, मीरा, बकुळा...
यांच्या रुपाने आपल्या माणसांची
उणीव भरून काढलीत...
माझं म्हणणं मांडताना,
वाणी अबोल, रडवेली झाली तेव्हा
लेखनाचा मोगरा हाती दिलात
त्याचा सुगंध पसरवण्यासाठीची
शक्तीही तुमचीच
तुम्हाला कसं समजतं सगळं
माझ्या मनातलं...
चेहऱ्यावर हास्य देत
इतरांनाही आनंद वाट
तुम्हीच सुचवता
तुमच्यामुळे फक्त तुमच्यामुळेच
माझ्या आयुष्यात सुखाचा झरा
पुन्हा खळाळत वाहू लागलाय
बागडण्यासाठी स्वप्नांचे
पंखही लाभलेत
खरंच, पुस्तक उघडलं नी जादू झाली
त्यात दिसलं निरागस गाव
मूलमंत्र तयाचा
पुस्तकी नको, पुस्तक व्हा...
पुस्तकी नको, पुस्तक व्हा...
तुमच्याविषयी काय बोलू?
माझी मलाच नव्याने ओळख,
तुम्ही करून दिलीत…
सगळं संपलं... असं वाटलं तेव्हा
माझा हात घट्ट धरून ठेवलात
एक काळ असा होता,
सोबतीला कोणी नव्हतं
साथ दिलीत तुम्ही
अगदी माझ्याही नकळत
लंपन, सावित्री, रमा-माधव, शर्मिष्ठा,
शितू, मीरा, बकुळा...
यांच्या रुपाने आपल्या माणसांची
उणीव भरून काढलीत...
माझं म्हणणं मांडताना,
वाणी अबोल, रडवेली झाली तेव्हा
लेखनाचा मोगरा हाती दिलात
त्याचा सुगंध पसरवण्यासाठीची
शक्तीही तुमचीच
तुम्हाला कसं समजतं सगळं
माझ्या मनातलं...
चेहऱ्यावर हास्य देत
इतरांनाही आनंद वाट
तुम्हीच सुचवता
तुमच्यामुळे फक्त तुमच्यामुळेच
माझ्या आयुष्यात सुखाचा झरा
पुन्हा खळाळत वाहू लागलाय
बागडण्यासाठी स्वप्नांचे
पंखही लाभलेत
खरंच, पुस्तक उघडलं नी जादू झाली
त्यात दिसलं निरागस गाव
मूलमंत्र तयाचा
पुस्तकी नको, पुस्तक व्हा...
पुस्तकी नको, पुस्तक व्हा...
