या सरींनी तर कमालच केली
घुसमटलेल्या, कोमेजलेल्या मनाला उभारी दिली!
अंगणात सरी झेलताना
लहान मूल होऊन बागडले
पाण्याचे थेंबही मोत्याचे झाले…
आपल्या प्रत्येकाच्याच अंतरात
पाऊस असतो
कधी धो-धो कोसळणारा
कधी रिमझिम बरसणारा
तर कधी नुसताच ढगात भरून राहिलेला कुंद कुंद
तरीही पावसाशी असलेलं आपलं नातं
काही केल्या तुटत नाही
म्हणूनच अगदी कुठल्याही क्षणी
आभाळ भरून आलं तरी
सरींची ही कमाल अनुभवायलाच हवी…
No comments:
Post a Comment