गुलमोहोरा किती मनमोहक
तुझ्या फांदीचा मोरपिसारा
ऊन्हाची ज्वाळा किती कठोर जाहली,
नयना सुखद गारवा वाटे
तुला पाहताना…
मनाला प्रसन्न करिसी
रणरणत्या उन्हातही खदखदून हसशी
पथिकासाठी अंथरली तू पुष्पगादी
पुसटशीही मरगळ न जाणवे
तुझ्या सर्वांगावर…
भगव्या लाल फुलांची
जत्रा
भरली तुझ्या फांदीवर…
भगवी लाल कुसुमे
हिरवीगार पर्णे
तुझे बहरलेले रोम रोम
मनाला पुन्हा पुन्हा
उल्हासित करते आहे
तुझे हे तेज, तुझे हे चैतन्य
खिडकीतून ती बालिका पाहते आहे

No comments:
Post a Comment