हिरव्या गर्द वनराईने
नटलेले
माझे गाव
जिथे आहेत उंचच उंच
डोंगर
आणि शिवबाचा सिद्धगड
याच गडाच्या पायथ्याशी
एका कौलारू इमारतीत
भरते मुलांची शाळा
शाळेमागे खेळांचे मैदान
जसे निसर्गाने दिले
आंदण
असे माझे गाव
जिथे राहतात लोक कष्टकरी
शेतात राबून आनंदाने
खातात भाजी-भाकरी
जिथे स्वयंभू रामेश्वराचे
स्थान
असे माझे गाव
तिथे छोटीशी नदी
फुलविते शेते सारी
तिथे वर्षातल्या महाशिवरात्री
रामेश्वराचा वार्षिकोत्सव
भारी
त्या निमित्ते एकोप्याच्या
भावनेने
माणसं बांधली जाती
दुःख सारे विरून जाई
असे माझे गाव
जिथे लोक राहती मजेत
सुख-दुःखे वाटून घेती
सर्वांची
जिथे मालवणी, कोकणी,
मराठी
संस्कृतीचे दर्शन घडे
असे माझे गाव

No comments:
Post a Comment