Sunday, 22 April 2018

पुस्तक व्हा...

पुस्तकांनो,
तुमच्याविषयी काय बोलू?
माझी मलाच नव्याने ओळख,
तुम्ही करून दिलीत…
सगळं संपलं... असं वाटलं तेव्हा
माझा हात घट्ट धरून ठेवलात
एक काळ असा होता,
सोबतीला कोणी नव्हतं
साथ दिलीत तुम्ही
अगदी माझ्याही नकळत


लंपन, सावित्री, रमा-माधव, शर्मिष्ठा,
शितू, मीरा, बकुळा...
यांच्या रुपाने आपल्या माणसांची
उणीव भरून काढलीत...


माझं म्हणणं मांडताना,
वाणी अबोल, रडवेली झाली तेव्हा
लेखनाचा मोगरा हाती दिलात
त्याचा सुगंध पसरवण्यासाठीची
शक्तीही तुमचीच


तुम्हाला कसं समजतं सगळं
माझ्या मनातलं...
चेहऱ्यावर हास्य देत
इतरांनाही आनंद वाट
तुम्हीच सुचवता
तुमच्यामुळे फक्त तुमच्यामुळेच
माझ्या आयुष्यात सुखाचा झरा
पुन्हा खळाळत वाहू लागलाय
बागडण्यासाठी स्वप्नांचे
पंखही लाभलेत


खरंच, पुस्तक उघडलं नी जादू झाली
त्यात दिसलं निरागस गाव
मूलमंत्र तयाचा
पुस्तकी नको, पुस्तक व्हा...
पुस्तकी नको, पुस्तक व्हा...


Wednesday, 28 February 2018

होळी



सोहळा रंग-सुगंधाचा
वसंतोत्सवाच्या चाहुलीचा
नव्या रुपाच्या जाणिवेचा
सृष्टीच्या सृजनाचा
नव्या उत्साहाचा
एकोप्यानं नांदत्या घराचा
आग्रह पुरणा-वरणाचा
पालवीसारखा हा कोमल क्षण
आज होळीचा सण ।।१।।



भूतकाळाचं सगळं ओझं
दडपण
ताण
थकवा
चिडचिड
चिंता
भीती
राग
नष्ट व्हावा यावेळी,
प्रत्येकाच्या आयुष्यात यावी
होळी मनमोकळी... ।।२।।

Monday, 12 February 2018

वक्त से पहले



कहते है,
मन के घाव
वक्त भर देता है।
क्या वो वक्त मुझे नसीब होगा?
मेरे लिए वक्त हमेशा 
किरनों की रोशनी की तरह है,
जो सिर्फ नजर आता है।
महसूस होता है।
उम्मीद का सवेरा लाता है।
बस्स और कुछ नही,
मेरी कहानी वही की वही थमी है...
शायद इसी वजह से
कोशिश यही रहती,
वक्त आने से पहले वक्त के बारें में सोचू
उसके आनेसे पहले अपनी पहल करू
लोग कहते चंचल, मूडी
उन्हे क्या पता
दिवारों से बाते करना
सब कुछ पास होकर भी
अपनेपन के एहसास को तरसना
ये प्यार शब्द जैसे मेरे लिए है ही नही


.... मेरे वक्त घडी में
वो रेत ही नही है।
खुद जो रेत बन गयी हूँ...
जिसपर धूप छाँव का कोई असर नही होता...
काश इस रेगिस्तान में
पानी ना सही
मन के व्दार तो खुले...