Thursday, 23 June 2016

सौंदर्यशास्त्र

कवीला विचारू नये,
तू कधी प्रेमात पडलास का?
त्याचं उत्तर त्याच्याकडे नसेल
तो फक्त किंचीत हसेल...
तुम्हाला जी प्रेमाची व्याख्या वाटते,
त्या चौकटीत
कवी, लेखकाला बसवू नका...
त्याचं आणि तुमचं प्रेमाचं जग
फार वेगळं आहे...
त्याने Negative लिहिलं;
तर त्याचा प्रेमभंग झालाय...
त्याने Positive लिहिलं;
तर तो प्रेमात पडलाय...
अशी विधानं करून,
स्वतःलाच फसवू नये...
‘अनुभवातून तो लिहितोय’
असं म्हणालात तर एक वेळ ठीक आहे
पण त्याने लिहिलेल्या शब्दांचा अर्थ
त्याच्या खाजगी आयुष्यात शोधू नका...
कितीतरी कवींच्या लेखनाची अवहेलना
याचमुळे झालीय...
‘फार वाईट वाटतं...’

एक साधा सरळ प्रश्न आहे,
अनुभवांचं मौलिक संचित
सगळ्यांकडेच असतं...
मग सर्वसामान्य माणसालासुध्दा
कवीसारखं (लेखकासारखं) लिहावसं का वाटत नाही?
उत्तर सोपं आहे...
त्या अनुभवाच्या मौलिक संचिताकडे पाहण्याचा
नवा दृष्टिकोन त्याच्याकडे आहे...
ज्यामुळे त्याला सतत नवनिर्मितीची ओढ लागलेली असते
म्हणूनच कवीच्या प्रेमाची अनुभूती आणि असीम प्रेमाला
बंदिस्त करू नका...
त्याने लिहिलेल्या शब्दांचा अर्थ शोधताना
सतत ‘शिक्के’ मारत राहू नका
आणि ‘ism’ मध्ये तर अजिबात कोंडू नका...
‘कलाकृतीचा आस्वाद’ घेणं
जितकं साधं सोपं, तितकच कठीण...
त्यासाठी एकच गोष्ट करायला हवी
‘सौंदर्यशास्त्र’ नावाच्या शाळेत नावनोंदणी
मग बघा, कलावंत आणि लेखकांशी
तुमची कशी छान गट्टी जमेल...!!!!!

Sunday, 1 May 2016

नाज

मेरे सपनें, मेरे वादें
इनमे फर्क सिर्फ इतना
जैसे आपकी सोच मेरे लिए...

सपनों के आशियाने से
ख्वाब देखने की ताकद मिली
और मैं निखर के आई तो;
आपको मुझपर हसतें हुए देखा

आपका हँसना जायज है
आपको यकीन दिलाना,
आप क्या सोचते है?
इसे बदलने की हिम्मत मुझमें कहाँ?
मुझे तो बस खुद पर विश्वास है
वो खोना नही चाहती,
किसी के भी बातों में आकर,
चाहें जो भी हो

एक अलग सोच के साथ
चल पड़ी हूँ मैं
रुकावटें तो आती रहेगी
और आनी भी चाहिए...
उनसे हार जाना,
डर के रुक जाना
मुझे मंजूर नही

इस सफर में
खुद को संभालते हुए
हर दिन की शुरुवात नए सिरे से करना
अब यही मेरी जिंदगी है
जिसपर मुझे नाज है...


Wednesday, 27 April 2016

भुईचाफ्यासारखी ‘ती’

भुईचाफ्यासारखी ती
अधिर नात्याच्या वाटेवर पावलं टाकताना,
स्वतःला स्वतःच जपणारी...
मातीशी मूळं घट्ट रोवून,
हवेत सुगंध उधळणारी...
मजबूत पानं आणि नाजूक पाकळ्यांनी,
मोहात पाडणारी...
पांढऱ्या आणि फिक्कट जांभळ्या रंगाने,
वेड लावणारी...

आयुष्य शंभर वर्षांचं की एका दिवसाचं?
असा हिशेब न मांडता;
जगण्यातली नशा, नजाकत
सतत टिकवून ठेवणारी...
आपलं हळवं मन सावरत,
हसून आभाळाकडे पाहणारी...

या विश्वाच्या पसाऱ्यात;
मी ही आहे !
माझं असणं नाकारू नका,
असं सांगताना अलगद मिटून जाणारी
भुईचाफ्यासारखी ती

Monday, 29 February 2016

जबरो फॅन

दर्शकों की नजरें जिसपर टिकी है, उस फॅन फिल्म का ट्रेलर लॉन्च हुआ, उससे पहले शाहरुख खान जी का जबरा फॅन ये गाना सोशल मीडिया के जरिये हर तरफ काफी पॉप्युलर हो रहा है, और अब इस गाने को अलग अलग भाषाओं मे भी बनाया गया है...ये बहुत अच्छी बात है...

मराठी, गुजराती, बंगाली, पंजाबी, भोजपुरी, तमिल इन भाषाओं में ये गाना और भी खुबसुरतीसे पेश किया गया है... अब मै कोंकण इलाके में बोली जानेवाली मालवनी बोली में इस गाने का अनुवाद करने का प्रयास कर रही हूँ... और कामना करती हूँ की आप सभी को ये पसंद आये... कुछ गलती हुई तो बताईयेगा जरुर...ताकी मुझे उसे सुधारने का मौका मिले...

भ्येटा लय मोठ्या फॅनला
आनी साजरा करूया ह्या फॅनचा गाना...


घरच्ये पन ना माज्या, 
समजत नाय त्येंका कदी कदी
तो फक्त स्टार नाय, दुनया आसा माजी...

फॉलो करतंय ट्विटरवर, टॅग करतंय फेसबुकवर
तुज्या क्विजसाटी गुगलला पाटी टाकलय
आरशात दिसतस, तू निज माजी उडवलंस
तुज्या मॅडनेस नी माका येडा केलॅन हा
तू रे सोड्याची बाटली, मिया ओपनर तुजा
मिया हँडल करतंय, सगळो नखरो तुजो
माज्या काळजाच्या मोबाईल चो तू
अनलिमिडेट प्लॅन झालं हस
मिया तुजो, हाय रे जबरो
व्हय रे जबरो फॅन झालं हय
अरे, तुका बगुन काळजात
ढँटॅढँण जाता हा
मिया तुजो, हाय रे जबरो
व्हय रे जबरो फॅन झालं हय… ।।१।।



मिया तुज्यावर केलंय पीएचडी
तू माजा नशीब, माजो हक तुज्यावर आसा
खराच मिया आयचॅन सांगतंय
तुका कोनी काय वायट बोलला
तर माजो जीव तुटता
अख्या गावात मिया
तुज्यासाठी येडो झालय रे
मिया तुजो, हाय रे जबरो
व्हय रे जबरो फॅन झालं हय
अरे, तुका बगुन काळजात
ढँटॅढँण जाता हा...
मिया तुजो, हाय रे जबरो
व्हय रे जबरो फॅन झालं हय...।।२।।


स्टायल तुजी झक्कास रे,
सट्टे तुज्यावर लागतत रे
तुज्यावांगडाच वाय फायचा
कनेक्शन जोडलय
तुज्यापर्यात जानारी
वाट सगळी तुडवलंय रे
कोन काय म्हंता
तेची परवा नाय माका
तुज्या सगळ्या अदा
येती डिट्टो माका
कदी खिशात ठेवलंय,
रोज तुका मनात जपलंय
तुज्या नादान मिया
येडो-खुळो झालंय
मिया तुजो, हाय रे जबरो
व्हय रे जबरो फॅन झालं हय
अरे, तुका बगुन काळजात
ढँटॅढँण जाता हा
मिया तुजो, हाय रे जबरो
व्हय रे जबरो फॅन झालं हय...।।३।।




(हिंदी भाषा में ये गाना सुनने के लिए निचे की लिंक पर क्लिक करें...)




Friday, 26 February 2016

ती म्हणाली...


ती म्हणाली,
हल्ली व्यक्त होण्यासाठी, 
सोशल मीडियाचा आधार घेते...
फेसबुक, व्टिटर, व्हाट्स अप, युट्यूब, लिंक्ड इन गुगल प्लस, ब्लॉग
सारी माध्यमं छानच आहेत,
मला मनसोक्त मन मोकळं करता येतं…
कसलीच बंधनं नसतात…
असं म्हणतात की,
सोशल मीडिया आपल्या हातात असलेलं कोलीत आहे.
त्याने जाळपोळ करायची की त्या कोलीताने शेकोटी पेटवून,
स्वतःसाठी उबदार वातावरण तयार करायचं?
हे आपल्या हातात आहे…
कधी कधी वाटतं लॅपटॉपला सोडून,
चार शब्द पेनाने लिहावेत कागदावर…
लॅपटॉपवर टाईप करताना, तोही थकतो आणि मीही
मग वाटतं कागदाला जसं माझं मन कळतं,
तसं यालाही कळत असेल का?
आता मी एकटी नसते...
माझ्याभोवती हे सोशल मीडियाचं
व्हर्च्युअल जग असतं...
मेंदूत त्याचा ‘डेटा’ खच्चून भरलेला असतो...
हा ‘डेटा’ जाणिवपूर्वक स्टोअर करावा लागत नाही,
तुमच्या मेंदूचा तो नकळत ताबा घेतो.
तुमच्यापुढे पर्याय नसतो.
तुम्ही स्वतःला मार्केट करत राहता…
आणि ‘सोशल इमेज’ जपण्यासाठी 
धडपडत राहता...

Saturday, 6 February 2016

भीगी सी एक नज्म

बारीश का मौसम है,
याद किसी की आ रही है।
आँखें नम हो रही है।
लेकिन वो कहाँ है?
जिसका हमें इंतजार है...

 जी नही चाहता की तुम्हें,
इक सपना समझ के भूल जाएँ।
क्योंकी इस दिल को तो,
तड़पने मे ही मजा आ रहा है।

तुमसे लागी लगन को,
मिटाएँ भी तो कैसे?
कंबख्त इन निगाहों मे,
तुम्हारी ही छवी है।

हमारे लिए आसान नही, तुम्हे भूल ना।
चाहें तुम हमें मुड़ के भी ना देखो।
पर हम तो वही खडे हैं,
जहाँ तुम हमें छोड़ आए थे।

हमारी जिंदगी में आओ,
सावन का पहला बादल बन के।
फिर देखों  दोनों ऐसे भिगेंगे,
प्यार की बारीश में।
के आँसू और पानी अलग ना लगे।
बस तुमसे मिलने की चाह में,
वो खुशी में बदल जाए।
हमेशा हमेशा के लिए...



लगता है, इंतजार ही इंतजार लिखा है,
हमारे नसीब में।
पर इस नसीब को भला कैसे कोसूँ?
अनजाने मे शायद फिर मिलना लिखा हो,
इसी नसीब में...

तुम्हारी यादें मेरी आँखों से,
दिल में समा गई।
अब इन्ही यादों की तुम्हे है कसम।
लौट आओ... जहाँ हो।

Sunday, 17 January 2016

ROSE (रोज) DAY

आज सूर्य उगवला
अगदी रोजच्यासारखा
कोंबड्याच्या आरवण्याने किंवा आलार्म मुळे जाग येते
तशी आजही जाग आली
पक्ष्यांच्या सुस्वर कुजनाने
उषेचे स्वागत झाले
सूर्यकिरणांची रांगोळी अंगणात आली

एक चैतन्यमयी पहाट
सूर्याचे येणे आणि चंद्राचे जाणे
एक दिवस संपतो
दुसरा सुरू होतो
आजचा हा नवा दिवस
कसा असेल? चांगला की वाईट? माहीत नाही.
ते घडवणं मात्र आपल्याच हातात आहे.
पण हा नवचैतन्य घेऊन येणारा
“DAY” कुठला हे आधीच ठरलेलं होतं
फ्रेंडशीप डे
व्हॅलेंटाईन डे
सारी डे
कि ट्रॅडिशनल डे...

तुझ्या शोधात

आठवणींच्या डोहात बुडताना
स्वप्नांची नदीही वाहत राहते...
एक एक धागा सैल सैल होत जातो,
आठवणींचा पट स्वप्नपटाला जोडला जातो
त्यावर रंगीबेरंगी चित्रे उमटू लागतात,
तुझ्यासोबत रंगवलेली
एक टुमदार घरकुल, त्यासमोरील अंगण
हिरवा शालू नेसून, सौभाग्य भूषणे लेवून
तुळशीपुढे दिवा लावणारी मी...
साऱ्या घराचं हित पाहणारी
तुझ्या सोबतीमुळे एकाकीपणाचा कलंक मिटला
आयुष्याला नवा अर्थ मिळाला, असं म्हणणारी मी
ही आणि अशी कितीक स्वप्ने साकार व्हावीत
ती उराशी घेऊन
तुझ्या शोधात
तुझीच...

Friday, 15 January 2016

मी मराठी

मराठी माणसा शहरात राहतोस,
मराठी बोलायला लाजू नको
मायमाऊली ही आपली प्रेमळ भाषा, 
परदेशात गेलास तरी विसरू नको
मराठी माती, प्रेमाची नाती, 
मराठी संस्कृती, मराठी बाणा विसरू नको
खूप शिक मोठा हो, परकीय भाषा बोल, 
त्यासाठी मराठीचा बळी जाऊ देऊ नको





मराठी कला, पोवाडा, किर्तन, दशावतार, पंढरीची वारी विसरू नको
महाराष्ट्राची परंपरा, संत-सज्जनांची आठव, शूर शिवबाला विसरू नको
गणपतीची आरती, भवानी आईचा गोंधळ, श्रावणमासाचा महिमा विसरू नको


मुलखाचा तू मर्द मराठा, 
तुझा पराक्रम, तुझी किर्ती 
दशदिशांना घुमू दे
आणि मी मराठी हे दोनच शब्द तुझ्या तोंडी 
अभिमानाने येऊ दे, अभिमानाने येऊ दे