Friday, 29 August 2014

पुन्हा नवे स्वप्न

पुन्हा नवे स्वप्न, पुन्हा नवी दिशा
आयुष्याच्या वाटेवरती, पुन्हा नवी आशा
नव्या उमटलेल्या तरंगाची, पुन्हा तीच दशा
या सर्वांचे रूपांतर, पुन्हा एकदा निराशा

हरएक स्वप्न फुलावे ही मनिषा
वाटते संपूच नये ही निशा
पुन्हा पसरतील काळ्या सावल्या अशा
नी खूप प्रयत्नांती उजाडेल उषा

आता तुझी तूच ठरव योग्य दिशा
पदरी पाडू नकोस पुन्हा एकदा निराशा
पाहिलेले स्वप्न फुलणारच हीच ठेव मनिषा
मग तुझीच असेल उजाडेल ती उषा


No comments:

Post a Comment