भुईचाफ्यासारखी ‘ती’
अधिर नात्याच्या
वाटेवर पावलं टाकताना,
स्वतःला स्वतःच
जपणारी...
मातीशी मूळं घट्ट रोवून,
हवेत सुगंध उधळणारी...
मजबूत पानं आणि
नाजूक पाकळ्यांनी,
मोहात पाडणारी...
पांढऱ्या आणि फिक्कट
जांभळ्या रंगाने,
वेड लावणारी...
आयुष्य शंभर
वर्षांचं की एका दिवसाचं?
असा हिशेब न मांडता;
जगण्यातली नशा,
नजाकत
सतत टिकवून ठेवणारी...
आपलं हळवं मन सावरत,
हसून आभाळाकडे
पाहणारी...
या विश्वाच्या
पसाऱ्यात;
‘मी’ ही आहे !
माझं असणं नाकारू
नका,
असं सांगताना अलगद
मिटून जाणारी…
भुईचाफ्यासारखी ‘ती’
No comments:
Post a Comment