Showing posts with label मी मराठी. Show all posts
Showing posts with label मी मराठी. Show all posts

Friday, 15 January 2016

मी मराठी

मराठी माणसा शहरात राहतोस,
मराठी बोलायला लाजू नको
मायमाऊली ही आपली प्रेमळ भाषा, 
परदेशात गेलास तरी विसरू नको
मराठी माती, प्रेमाची नाती, 
मराठी संस्कृती, मराठी बाणा विसरू नको
खूप शिक मोठा हो, परकीय भाषा बोल, 
त्यासाठी मराठीचा बळी जाऊ देऊ नको





मराठी कला, पोवाडा, किर्तन, दशावतार, पंढरीची वारी विसरू नको
महाराष्ट्राची परंपरा, संत-सज्जनांची आठव, शूर शिवबाला विसरू नको
गणपतीची आरती, भवानी आईचा गोंधळ, श्रावणमासाचा महिमा विसरू नको


मुलखाचा तू मर्द मराठा, 
तुझा पराक्रम, तुझी किर्ती 
दशदिशांना घुमू दे
आणि मी मराठी हे दोनच शब्द तुझ्या तोंडी 
अभिमानाने येऊ दे, अभिमानाने येऊ दे