Tuesday, 30 September 2014

कवी

आपुलकी, प्रेम, जिव्हाळा
कवीचे हे आवडते शब्द

कवीला आपुलकी शब्दरत्नांची
तो शब्दांना बहाल करतो
सौंदर्याचा फुलोरा
त्यांच्याशी तो खेळतो, त्यांच्याशी भांडतो
त्यांना तो गुंफतो पुष्पमाळेपरी…

‘प्रेम’ कवीच्या काव्याचा आवडता विषय
धुंद, हळूवार प्रीतीचे वर्णन करतो कवी
त्याचे प्रेमकाव्य मग
भुरळ घालते प्रेमी युगुलांना
आणि ओठांवर उमलते भावगीत…

विश्वातील सा-या गोष्टींचा
कवीला जिव्हाळा
तो रखरखत्या उन्हालाही
सोन्यासारखे म्हणतो,
आणि उजाड, ओसाड जागीही
फुलवतो कुसुमांचा मळा…



No comments:

Post a Comment