प्रवेश घेतला अकरावीसाठी
तेव्हा पहिल्यांदा
पाहिलं
विल्सन महाविद्यालय
अन् जगण्याचा अर्थ
गवसला
अभ्यासासोबत कलेचे
ज्ञान मिळाले
आयुष्य माझे फुलून
आले
अन् जगण्याचा अर्थ
गवसला
बारावीच्या नाजूक वळणावर
काव्य मला इथे स्फुरले
अन् जगण्याचा अर्थ
गवसला
इथे इंग्रजीचा असून
पगडा
मराठीचा श्वास जाणवला
अन् जगण्याचा अर्थ
गवसला
मालवणी चेडू असूनसुद्धा
सन्मान मिळाला इथे
मला
अन् जगण्याचा अर्थ
गवसला
जेव्हा जेव्हा मी या
वास्तूत
प्रवेश करते
आनंदाने येतो ऊर भरून
इथे आहे स्वातंत्र्य
विचारांचे
मखमली पंख स्वप्नांचे
आशेच्या शब्दांना सत्यात
उतरवणारे
या महाविद्यालयात घेऊन
प्रवेश
जोड विश्वासाची कल्पनेला
मिळाली
अन् जगण्याचा अर्थ
गवसला
No comments:
Post a Comment