पाहिला तुझा पाठलाग
लपून छपून येण्याचा
मला सोनेरी स्पर्श
करण्याचा
आणि भेटण्यासाठी
एवढे उतावीळ होण्याचा
काळ्या पांढ-या रेषांनी
भयानक होते रात्र
कुठेतरी उद्याचा कवडसा
डोकावत राहतो हळूच
त्याला स्वप्नांची
केविलवाणी साथ
कधीतरी उजाडेल
याच उमेदीने जगतो माणूस
पहाटे तुला एकदा पाहिले
की जीव धन्य होतो
हात न जोडता
क्षणभर डोळे मिटून
घेते,
नि शांत होते
तुझा तो पाठलाग
हवाहवासा वाटतो
तुझी चाललेली अडथळा
शर्यत
मागे वळून पाहते
चालू दे तुझा पाठलाग
असाच
तेवढीच कुणाची तरी
सोबत...

No comments:
Post a Comment