मला माहीत नाही
काय आहे हे नातं
जे बांधून ठेवतंय आपल्याला
खूप छान, निखळ, नितळ
वाटतंय
मला माहीत नाही
का मी तुझाच विचार
करतेय
पण हे खरंय
कारण तू माझ्यासाठी
अनमोल आहेस
मला माहीत नाही
आपण का एकमेकांशी
अनोळखी म्हणून बोलतो
चेह-यावर दाखवतोय असे
जसे काही घडलेच नाही
पण आपण एकमेकांना
जे सांगू पाहतोय
ते अजून अबोलच आहे
ह्रदयातली ती भावना
दडपली जातेय
आतल्या आत
काय आहे ही भावना
दोघांनाही कळतंय
पण वळत नाही
आपलं हे प्रेम...
सुंदर रचना.... अनुभवविश्व साकारणार्या.
ReplyDelete