झाडे साजरा करतात
सृजनाचा उत्सव
जपतात हिरवे ऋणानुबंध
चंद्रासोबत फुलणारी रात्र
डोळ्यात बावरी स्वप्नं देते
आणि मन सुखावून जाते...
एका सुंदरशा वळणावरती
मागे वळून पहावेसे वाटले
दिसला गुलमोहोराचा पिवळा सडा...
कितीतरी दिवसांनी आज
या शहरात चंद्र दिसला
वाटतंय सारं शहर शांत आहे...
प्राजक्ताचे बहरणे
पाहिले नाही कधी
गोष्ट तशी साधी-सुदी
पावसाच्या धारा,
कधी अंगणात…
कधी अंतरात…
आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहताना
आशेचा किरण घेऊन आलेली…
‘आपली ओळख’ प्रत्येकाने
जपायलाच हवी…
श्रावण मासात ऊन-पावसाचा खेळ
तसा सुख-दु:खाचा मेळ
आपल्या आयुष्यात…
भरले मेघ, मयुराला हर्ष
तिच्या जीवनपटाला
मिट्ट काळोखाचा स्पर्श…
एक सुंदर स्वप्न आहे
फांदीआडून डोकावणाऱ्या चंद्रासारखं
मनाला सुखद गारवा देणारं...

very good.....nice writing...
ReplyDeleteधन्यवाद....
ReplyDelete