Tuesday, 30 June 2020

जशी ‘पंढरीची वारी’


जशी पंढरीची वारी



एक विलक्षण काहीसं
ज्याची सतत ओढ असते...
त्याविषयी काही समजलेलं नसतं!
तरी त्याला
भेटावसं,
भिडावसं,
मिळवावसं वाटतं!
कधी मध्येच,
हरल्यासारखं,
चुकल्यासारखं वाटतं!
तरीही मन
विश्वासाचा एक धागा,
घट्ट पकडून ठेवतं!
अनुभवलेल्या असंख्य क्षणांतून
प्रेरणेच्या कळ्या वेचतं!


हे विलक्षण म्हणजे काय?
हे शोधणं, जाणून घेणं सुरुच राहिल...
जशी पंढरीची वारी
दिस मोगरा नि चित्त एकरुप
ध्येयापाशी...

No comments:

Post a Comment