स्वप्नं संपली नी हाती
उरल्या
फक्त कोमेजलेल्या पाकळ्या
त्यांना एकत्र करावं की
ठेवाव्या वेगळ्या
त्यातून नवं काही निर्माण
होईल का?
हाती घेऊन एकदा पहिल्या सगळ्या
मग स्वप्नाला आठवून
वाऱ्यावर उधळून दिल्या मोकळ्या
मनही झालं मोकळं
स्वप्नांना पुन्हा जन्म देण्यासाठी
स्वप्नांचं फुलणं आणि
कोमेजणं
सतत सुरुच राहतं
म्हणून स्वप्न पहायचं थांबू
नये
स्वप्न फुलांचा गंध
श्वासात भरून घ्यावा
आणि कोमेजलेल्या पाकळ्या
उधळून द्याव्या वाऱ्यावर
स्वप्नांना पुन्हा पुन्हा
जन्म घेण्यासाठी
स्वप्नांची झूल वास्तवाला
सुसह्य करते
स्वप्नांसाठी मन मोकळं करा
आणि कोमेजलेल्या पाकळ्या
वाऱ्यावर उधळत रहा
याच आनंदाच्या छायेत
एकेक स्वप्न साकार होईल
वाऱ्यावर उधळलेली प्रत्येक
पाकळी
फूल होऊन हसत राहील...

Niceeee
ReplyDelete