आज सूर्य उगवला
अगदी रोजच्यासारखा
कोंबड्याच्या आरवण्याने
किंवा आलार्म मुळे जाग येते
तशी आजही जाग आली
पक्ष्यांच्या सुस्वर
कुजनाने
उषेचे स्वागत झाले
सूर्यकिरणांची रांगोळी
अंगणात आली
एक चैतन्यमयी पहाट
सूर्याचे येणे आणि चंद्राचे
जाणे
एक दिवस संपतो
दुसरा सुरू होतो
आजचा हा नवा दिवस
कसा असेल? चांगला की वाईट? माहीत नाही.
ते घडवणं मात्र आपल्याच
हातात आहे.
पण हा नवचैतन्य घेऊन येणारा
“DAY” कुठला हे आधीच ठरलेलं होतं
फ्रेंडशीप डे
व्हॅलेंटाईन डे
सारी डे
कि ट्रॅडिशनल डे...


manatal 1 gupit satya
ReplyDelete