आठवणींच्या डोहात बुडताना
स्वप्नांची नदीही वाहत
राहते...
एक एक धागा सैल सैल होत
जातो,
आठवणींचा पट स्वप्नपटाला
जोडला जातो
त्यावर रंगीबेरंगी चित्रे
उमटू लागतात,
तुझ्यासोबत रंगवलेली…
एक टुमदार घरकुल,
त्यासमोरील अंगण
हिरवा शालू नेसून, सौभाग्य
भूषणे लेवून
तुळशीपुढे दिवा लावणारी
मी...
साऱ्या घराचं हित पाहणारी
तुझ्या सोबतीमुळे
एकाकीपणाचा कलंक मिटला
आयुष्याला नवा अर्थ मिळाला,
असं म्हणणारी मी
ही आणि अशी कितीक स्वप्ने
साकार व्हावीत
ती उराशी घेऊन
तुझ्या शोधात
तुझीच...
khup chan manala bhaun gele.
ReplyDelete