चैत्र चाहुल
मनाला हुरहुर,
स्वप्नातून साकारणाऱ्या
भविष्याची
चैत्राचं आगमन,
जीवनातील वसंतऋतूचं स्वागत
उभारून गुढी, आपल्याच कणखर
हातांनी...
चैत्र मास
रंगीत, गंधीत कुसुमांचा
उत्सव
मनाला दिलासा,
सुखाच्या पाऊलवाटेचा…
चैत्राचा तरंग,
मन आशेच्या पालवीने लुब्ध
बागडतो फांदीवर स्वप्नांचा
विहंग
चैत्र मोहरला,
चैत्र रंगला,
चैत्र गंधाळला,
चैत्र सजला,
चैत्र नटला,
चैत्र शहारलेला,
चैत्र नवचैतन्याने बहरलेला,
नयनी तृप्त साठवलेला...
चराचर सृष्टीचा हा 'चैत्र'सोहळा!!!!!




mast.
ReplyDeletethank u so much...
Delete